लातूर – लातूर शहरातील (latur city) एका तीन मजली इमारतीला सकाळी भीषण आग लागल्याची (fire incident) घटना घडली. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील दोन महिलांसह तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत.
कुसुमबाई लोंढे, प्रमिला लोंढे आणि सुनील लोंढे अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गावर असलेल्या तीन मजली इमारतीला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. (latur news)
सकाळी अचानक आग लागल्यानंतर पायऱ्याने उतरत असताना गुदमरून पडल्याने तिघांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर लोंढे यांच्याकडे भाड्याने राहणाऱ्या तिघांनी साडीचा दोर करून कसा-बसा आपला जीव वाचवला. अग्निशमनच्या दोन बंबांनी ही आग आटोक्यात आणली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.