World Cup 2023 India vs New Zealand Match Live Score : वर्ल्ड कप 2023 मध्ये आज भारताचा सामना न्यूझीलंडशी होत आहे. या आवृत्तीचा हा 21वा सामना आहे. धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला . टाॅस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने डॅरिल मिशेलच्या शतकी आणि रचिन रवींद्रच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर निर्धारित 50 षटकांत सर्व गडी गमावून 273 धावा केल्या आहेत. हा सामना जिंकण्यासाठी भारताला 274 धावांची गरज आहे.
विजयासाठी 274 धावांचा पाठलाग करताना 13.2 षटकात 76 धावांवर भारताची दुसरी विकेट पडली. शुभमन गिल 31 चेंडूत 26 धावा करून बाद झाला. लॉकी फर्ग्युसनने त्याला डॅरिल मिशेलकरवी झेलबाद केले. आता विराट कोहलीसोबत श्रेयस अय्यर क्रीझवर आहे. त्याआधी 11.1 षटकात 71 धावांवर भारताची पहिली विकेट पडली. रोहित शर्मा 40 चेंडूत 46 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत चार चौकार आणि चार षटकार मारले. लॉकी फर्ग्युसनचा चेंडू त्याच्या बॅटच्या आतील काठाला लागला आणि स्टंपवर गेला.
CWC2023. WICKET! 13.2: Shubman Gill 26(31) ct Daryl Mitchell b Lockie Ferguson, India 76/2 https://t.co/MrCP495zvG #INDvNZ #CWC23
— BCCI (@BCCI) October 22, 2023
तत्पूर्वी, टाॅस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने डॅरिल मिशेलच्या शतकी आणि रचिन रवींद्रच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर निर्धारित 50 षटकांत सर्व गडी गमावून 273 धावा केल्या आहेत. हा सामना जिंकण्यासाठी भारताला 274 धावांची गरज आहे. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेलने सर्वाधिक 130 धावा केल्या. रचिन रवींद्रने 75 आणि ग्लेन फिलिप्सने 23 धावांचे योगदान दिले. या तिघांव्यतिरिक्त केवळ विल यंग (17 धावा) दुहेरी आकडा गाठू शकला. भारताकडून मोहम्मद शमीने पाच आणि कुलदीप यादवने दोन बळी घेतले. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
दरम्यान, नाणेफेकीचा कौल हा भारतीय संघाच्या बाजूनं लागला. कर्णधार रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.(India won the toss and elected to field)या सामन्यात हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकूर खेळत नसल्याचे रोहितने टॉसदरम्यान सांगितले. त्यांच्या जागी मोहम्मद शमी आणि सूर्यकुमार यादव यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडने एकही बदल केलेला नाही.
IND vs NZ Live: दोन्ही संघांचं प्लेइंग 11 :-
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड : डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार आणि यष्टिरक्षक), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.