Nepal Earthuake : नेपाळमध्ये भूकंपाचे (Earthuake) मोठे धक्के जाणवले आहेत. ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप (Earthuake) झाला असल्याची माहिती नॅशनल सिस्मॉलॉजी सेंटरने दिली आहे. नॅशनल भूकंप मॉनिटरिंग अँड रिसर्च सेंटरच्या माहितीनुसार, सकाळी ७.३९ वाजता भूकंपाचे (Earthuake) धक्के जाणवले. नेपाळमधील धाडिंग जिल्ह्यात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. मात्र, यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
धाडिंग जिल्ह्यातील नोकरशहा बद्रीनाथ गैरा यांनी सांगितले की, याठिकाणी जोरदार हादरा जाणवला. नेपाळ भूकंपाचे धक्के दिल्ली-एनसीआरपर्यंत जाणवले. युरोपियन भूमध्य भूकंप (Earthuake )विज्ञान केंद्राच्या मते, भूकंपाचा केंद्रबिंदू 13 किलोमीटर खाली होता असे सांगण्यात येत आहे.
#Earthquake (#भूकम्प) possibly felt 1 min 6 sec ago in #Nepal. Felt it? Tell us via:
📱https://t.co/bvL9EDQjKG
🌐https://t.co/44vngdM2ty
🖥https://t.co/OSr2jaub9Y
⚠ Automatic crowdsourced detection, not seismically verified yet. More info soon! pic.twitter.com/ekSXOeR7xN— EMSC (@LastQuake) October 22, 2023
नेपाळमध्ये वारंवार भूकंप (Earthuake)होत असतात. यापूर्वी 16 ऑक्टोबर रोजी नेपाळच्या सुदूर पश्चिम प्रांतात 4.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. नेपाळ हे भारतीय आणि तिबेटी टेक्टोनिक प्लेट्समध्ये वसलेले आहे. या टेक्टोनिक प्लेट्स दर 100 वर्षांनी दोन मीटरपर्यंत सरकतात, त्यामुळे दबाव निर्माण होतो आणि भूकंप होतात. 2015 मध्ये नेपाळमध्ये 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप (Earthuake)आणि त्यानंतरच्या धक्क्यांमुळे जवळपास 9,000 लोक मरण पावले.
नेपाळ सरकारच्या पोस्ट-डिझास्टर नीड्स असेसमेंट रिपोर्ट (PDNA) नुसार, नेपाळ हा जगातील सर्वात जास्त भूकंप प्रवण देशांपैकी 11 वा आहे. अलीकडच्या काळात जगभरात वारंवार होणाऱ्या भूकंपांनी शास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेतले आहे.