Dalip Tahil Jail : बॉलिवूड इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध कलाकार, दलीप ताहिल यांनी आपल्या कामाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. मात्र दलीप ताहिल आता अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. दलीप ताहिलला 2 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल बोलायचे झाले तर, 2018 मध्ये दलीप ताहिल एका ऑटोरिक्षाच्या धडकेत सहभागी झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, दलीप ताहिल हे दारूच्या नशेत गाडी चालवत होते. अपघातानंतर पोलिसांनी दलीप ताहिलला अटक केली.
दलीप ताहिलला खार, मुंबई येथे एका महिलेला जखमी केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले. आता या प्रकरणात कोर्टाने त्याला 2 महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. बातमीनुसार, दलीप ताहिलने मद्यधुंद अवस्थेत ऑटोरिक्षाला धडक दिली तेव्हा त्या ऑटोमध्ये एक तरुण आणि एक तरुणी उपस्थित होते. जे या धडकेनंतर जखमी झाले.
दलीप ताहिलच्या ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात डॉक्टरांच्या अहवालाला मोठा आधार मानण्यात आला आहे. डॉक्टरांचा अहवाल लक्षात घेऊन न्यायालयाने हा निकाल दिला आहे. अहवालानुसार, डॉक्टरांच्या अहवालात दारूचा वास आढळला होता. त्या काळात दलीपला स्वतःला नीट चालताही येत नव्हते. त्याच्याशी नीट बोलताही येत नव्हते. या सर्व गोष्टींचा पुरावा म्हणून विचार करून न्यायालयाने कलाकाराला 2 महिन्यांची शिक्षा सुनावली आहे.