Bollywood : स्त्री, छिछोरे, एक खलनायक यांसारख्या चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री श्रद्धा कपूरही सोशल मीडियावर सक्रिय असते. चाहत्यांना श्रद्धा कपूरची गोंडस शैली खूप आवडते, तिच्या फोटो आणि व्हिडिओंवर चाहते खूप प्रेम व्यक्त करतात.
नुकताच श्रद्धा कपूरने तिचा एक सुंदर फोटो शेअर केला होता, जो चाहत्यांना आवडला होता, याच फोटोवर हृतिक रोशनने कंमनेट्स केली आहे. यामुळे ‘क्रिश 4’ या चित्रपटात हृतिक रोशन आणि श्रद्धा कपूर एकत्र दिसणार असल्याची चर्चा सोशलवर रंगली आहे.
दरम्यान, नुकतेच श्रद्धा कपूरने तिचे सनकीस केलेले फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. या फोटोंसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘सूर्यप्रकाश जादूप्रमाणेच आवश्यक आहे.’ या पोस्टवर अनेक चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी कमेंट केल्या असल्या तरी हृतिकची प्रतिक्रिया चर्चेत आली. हृतिकने पोस्टवर लिहिले, ‘तो येत आहे… मी त्याला सांगेन.’ यानंतर श्रद्धाने लिहिले- ‘खरंच? केव्हा…काय…कुठे… सांग मला सांग मला…’ या संवादावरून ती क्रिश ४ मध्ये दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे.
जादूवर हृतिक रोशन आणि श्रद्धा कपूर यांच्यातील या संभाषणानंतर, क्रिश 4 मध्ये श्रद्धा कपूर मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आता चांगली रंगली आहे. 2003 मध्ये रिलीज झालेल्या ‘कोई मिल गया’ चित्रपटात एलियनचे नाव जादू होते. जे रोहित मेहराला (हृतिक रोशन) शक्ती देते. मात्र, चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कोणतीही जादू नव्हती आणि रोहितचा मुलगा क्रिशची कथा होती. हृतिक-श्रद्धाच्या पोस्टवरून आशा आहे की आता चित्रपटातही जादू परत येऊ शकते.
अभिनेता हृतिक रोशन सध्या फायटर या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 2024 च्या सुरुवातीला प्रदर्शित होणार आहे, ज्यामध्ये दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करणार आहे. श्रद्धा कपूरबद्दल सांगायचे तर, ती शेवटची तू झुठी मैं मकर या चित्रपटात दिसली होती, ज्याला प्रेक्षकांनी खूप पसंत केले होते. श्रद्धा कपूर सध्या स्त्री 2 चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, ज्यामध्ये तिच्यासोबत राजकुमार राव आणि पंकज त्रिपाठी दिसणार आहेत.