गंगटोक : पश्चिम सिक्कीम जिल्ह्यात झालेलया मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झाले. यात सुमारे 100हून अधिक घरांचे नुकसान झाले असून पूलही वाहून गेले आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
कॉलेज खोला व्हॅलीच्या वरच्या भागात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठा पूर आला. या पुरात सिम्फोक येथील एक मोठा पूल वाहून गेला. याशिवाय ग्यालशिंग जिल्ह्यांतर्गत दंतम उपविभागालाही भूस्खलनाचा फटका बसला. यात अनेक घरांचे आणि रस्त्यांचे नुकसान झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
लोअर सापुंग येथील कॉलेज खोलावरील झुलता पूलही वाहून गेला आहे. या भूस्खलनात काही नागरिक अडकले असून बाधितांना तात्काळ मदतकार्य देण्यात येत आहे.