मुंबई – अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग सध्या लाइमलाइटपासून दूर आहेत. अशात त्यांच्या नव्या घराच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहे. सोशल मीडियावर दीपिका रणवीर यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, यामध्ये दीपिका रणवीर आपल्या कुटूंबीयांसोबत घराचे बांधकाम बघतांना दिसत आहे.
या व्हिडिओवरून चाहते अंदाज लावत आहे की लवकरच रणवीर दीपिका त्यांच्या नवीन घरात शिफ्ट होणार आहेत,ज्याचे सध्या बांधकाम सुरू आहे. 11 जून रोजी या जोडप्याने त्यांच्या घराच्या बांधकामाच्या ठिकाणी भेट दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
दीपिका रणवीरचे हे घर मन्नत म्हणजे शाहरुख खानचा शेजारी बांधण्यात येत आहे. रिपोर्ट्सनुसार दीपिका-रणवीरने सागर रेशम या बँडस्टँड इमारतीच्या १६, १७, १८ आणि १९ मजल्यांवर पसरलेले अपार्टमेंट्स खरेदी केले होते. यामध्ये त्याची किंमत 119 कोटी रुपये आहे. याशिवाय दोघांनी अलिबागमध्ये घरही घेतले आहे.
दीपिका पदुकोण शेवटची ‘पठाण’ मध्ये दिसली होती. या चित्रपटात तिने शाहरुख खानसोबत काम केले होते. यात जॉन अब्राहम आणि सलमान खान यांचा समावेश होता. दीपिका आता ‘प्रोजेक्ट के’मध्ये दिसणार आहे. प्रभाससोबतचा हा तिचा पहिला चित्रपट आहे. हा चित्रपट दोन भागात बनणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नाग अश्विन दिग्दर्शित, या चित्रपटात अमिताभ बच्चन देखील आहेत आणि 12 जानेवारी 2024 रोजी पडद्यावर येतील. दीपिका पदुकोणकडेही हृतिक रोशनसोबत ‘फायटर’ आहे.