मुंबई – ‘आदिपुरुष’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आला आहे. या चित्रपटात अभिनेता प्रभासने प्रभू श्रीरामाची, तर अभिनेत्री क्रिती सेनॉनने सीतेची भूमिका साकारली आहे. मात्र अनेकांना या कलाकारांची भूमिका पसंत पडलेली नाही. नुकतेच अभिनेत्री क्रिती सेनॉनने सीतेची भूमिके साकारलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. यावरून तिला ट्रोल करण्यात आले आहे.
क्रिती सेनॉनने ‘आदिपुरुष’ चित्रपटातील सीता मातेच्या भूमिकेतील एक फोटो शेअर करत “सीता मॉं, माय जानकी” असे कॅप्शन दिले आहे. यावरून नेटकऱ्यांनी तिला “कृपया स्वत:ची तुलना सीता मातेबरोबर करून नको” असे सांगितले आहे. तर आणखी एका नेटकऱ्याने कमेन्ट करत लिहिले की, “रामायणातील पाच श्लोक पण तुला येत नसतील.” क्रितीने सीतेच्या भूमिकेतील तिच्या फोटोसह तिच्या आईचा देखील फोटो शेअर केला आहे.
View this post on Instagram
ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट 16 जून 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. ‘आदिपुरुष’च्या ॲडव्हान्स बुकिंगला रविवारपासून सुरुवात झाली असून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या एका दिवसांत या चित्रपटाची 50 हजारांहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. त्यामुळे या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमधून आतापर्यंत दोन कोटींचा गल्ला जमावला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.