मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेलं नाव म्हणजे अभिनेत्री ‘निवेदिता सराफ’. ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘धुमधडाका’, ‘माझा छकुला’, ‘अशी ही बनवाबनवी’सारख्या मराठी चित्रपटांमधून निवेदिता सराफ यांनी एकेकाळी रुपेरी पडदा गाजवून टाकला होता.
अभिनयक्षेत्रात काम करता करता त्या आपली स्वयंपाकाची आवड आवर्जून जोपासतात. विशेष बाब म्हणजे त्यांनी स्वतःच असं एक युट्यूब चॅनल देखील सुरु केलं आहे. आणि या चॅनवर त्या नवनवीन पदार्थांच्या रेसिपी शूट करून टाकत असतात. त्या सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या लाईफच्या अपडेट त्या नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करत असतात.
अशात निवेदिता यांनी शेअर केलेली पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. निवेदिता यांनी त्यांना आलेला वाईट अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. मालाडच्या एका मॉलमध्ये वाईट वागणूक मिळाल्याचं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं. यावर अनेकांनी कमेंट करत आम्हालाही असेच अनुभव येतात असं म्हटल आहे.
त्या इन्स्टा पोस्टमध्ये लिहितात,’मी मालाड येथील इन्फिनिटी मॉलमधील मॅक्स स्टोरमध्ये गेले त्यावेळी तिथला स्टाफ फारच वाईट वागणूक देणारा होता त्यामुळे मला फार वाईट अनुभव आला आहे. तेथील सेल्स स्टाफला ग्राहकांशी वागणायची मुळीच शिस्त नाही. तुम्ही काय खरेदी करत आहात आणि काय नाही याच्याशी त्यांना काहीच घेणंदेणं नव्हतं. मी एक सेल्फ स्टाफला कपड्यांबाबत विचारले असते. मुलगी माझ्याकडे आली आणि मला वेळ नाही सांगत तिने दुसऱ्या सेल्समनला बोलावलं. दुसऱ्या एका सेल्समनने मला ओळखलं आणि माझी माफी मागितली. त्याने मॅनेजरला बोलावलं. मी सेलिब्रिटी आहे म्हणून नव्हे तर मी एक ग्राहक आहे म्हणून मला चांगली वागणूक हवी होती. मी ते डिझर्व्ह करते आणि जो स्टोरमध्ये येईल तो प्रत्येक व्यक्ती हे डिझर्व्ह करतो.’ त्यांच्या या अनुभवाच्या पोस्टवर सोशल मीडिया युजर्सकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहे.