नेवासा (प्रतिनिधी) – तालुक्यात रविवारी दुपारी झालेल्या चक्रीवादळाने अनेक झाडे उमळून पडले,त्याचबरोबर केळी पिके मोडून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
नेवासा तालुक्यात रविवारी (दि. ४ जून) दुपारी १ वाजेच्या सुमारास अचानक सुरू झालेल्या चक्री वादळामुळे एकच हाहाकार उडाला.
सुमारे तासभर सुरू असलेल्या या वादळामुळे अनेक गावातील झाडे उन्मळून पडल्याने अनेक ठिकाणी रस्तेही बंद झाले होते. त्याच बरोबर विजेच्या खांबावर झाडे पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता.
या चक्रीवादळाने नेवासा तालुक्यातील भेंडा ,सौंदळा शिवार, भेंडा खुर्द, भेंडा बुद्रुक यासह अनेक गावातील शेतकऱ्यांचे केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या केळी पिकांचे प्रशासनाने त्वरीत पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.