बीजिंग : चीनने सर्वसामान्य माणसाला घेऊन एका अंतराळ यानाचे उड्डाण केले आहे. शेन्झाऊ-16 या आपल्या अंतराळ अंतराळ स्थानकावर हे अंतराळ यान पाठवण्यात आले आहे.
अंतराळ स्थानकावरील अंतराळवीरांना जमिनीवर आणून नवीन कर्मचाऱ्यांना तेथे पाठवण्यासाठी या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले. चीनच्या वायव्येकडील जिक्वुआन सॅटेलाइट लॉंच सेंटरमधून या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले, असे चीनच्या “चायना मॅन्ड स्पेस एजन्सी’ने म्हटले आहे.
यानाचे प्रक्षेपण झाल्यानंतर 10 मिनिटांनी हे यान रॉकेटपासून वेगळे झाले आणि अंतराळ कक्षेमध्ये आपल्या निर्धारित स्थानावर जाऊन पोचले. यानातील सर्व कर्मचारी सुखरूप असून या यानाचे प्रक्षेपण पूर्णपणे यशस्वी झाले आहे.
तासाभरानंतर हे अंतराळ यान पृथ्वीपासून 400 किलोमीटर उंचीवरील अंतराळ स्थानकास जोडले गेले. त्यानंतर शेन्झाऊ-16 मधील अंतराळवीर तियान्हे मोड्युलमध्ये प्रवेश करतील आणि शेन्झाऊ-15 चे अंतराळवीर पृथ्वीवर परत येण्याची तयारी करतील, असेही एजन्सीने म्हटले आहे. बेहॅंग विद्यापिठातील प्राध्यापक गुई हैचाओ यांना या मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले आहे. अशाप्रकारच्या अंतराळ स्थानकावरील कर्मचाऱ्यांच्या जागेवर चीनने प्रथमच सर्वसामान्य माणसाला पाठवले आहे.