मुंबई – अभिनेत्री मृणाल ठाकूरने टीव्ही मालिकांमधून आपल्या अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली. ‘जर्सी’ सारख्या चित्रपटात शाहिद कपूरसोबत मृणाल दिसली होती. यानंतर तिच्या अभिनयाचे सर्वानीच कौतुक देखील केले. मात्र आता मृणाल तिच्या बॉयफ्रेंडबाबत केलेल्या खुलाश्यामुळे चांगलीच चारसहत आली आहे. एका मुलाखतीत एक्स बॉयफ्रेंडबाबत सांगताना तो पळून गळा असल्याचा खुलासा मृणालने यावेळी केला आहे.
मृणाल आपल्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये सध्या खूप व्यस्त आहे. ‘सीता रामम’ या चित्रपटामध्ये मृणालने केलेल्या अभिनयाचे कौतुक झाले होते. ‘पूजा मेरी जान’, ‘पिप्पा’, ‘आँख मिचोली’, ‘नानी ३०’ हे मृणालचे आगामी चित्रपट आहेत. मात्र तत्पूर्वी ती आपल्या एक्स बॉयफ्रेंडबाबत केलेल्यूए वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.
एका युट्यूबरशी बोलताना मृणालने आपल्या रिलेशनबाबत सांगितलं. मृणाल म्हणते “तो पळून गेला. तो म्हणायचा ‘तू खूप इंपल्सिव आहेस, मी याला सामोरे जाऊ शकत नाही’, ‘तू एक अभिनेत्री आहेस,’ मी त्याचा सामना करू शकत नाही. बरं, मला समजलं आहे की तू खूप जुनाट विचारांच्या पार्श्वभूमीतून आली आहे. आणि मी त्याला दोष देत नाही.” मृणाल पुढे म्हणते, आमचं नातं संपलं ते चांगलच झालं कारण भविष्यात आमच्या मुलांचं संगोपन असं झालं असत तर नेमकं काय झालय ? असा प्रश्न मुलांना पडला असता. असं मृणाल आपल्या एक्स बॉयफ्रेंडबाबत बोलताना म्हणाली.
मृणाल यापूर्वी अक्षय कुमारच्या सेल्फीमध्ये पाहुनी कलाकार म्हणून दिसली होती. अभिनयासोबतच मृणाल आपल्या खाजगी आयुष्यामुळे देखील चांगलीच चर्चेत होती. बॉलिवूडसह साऊथ इंडस्ट्रीमध्ये देखिल मृणालचे फॅन फॉलोविंग मोठे आहे.