अहमदाबाद – अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यापूर्वी मुसळधार पाऊस पडत आहे. अशा स्थितीत नाणेफेकीला विलंब होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, पावसामुळे नाणेफेक अद्याप झालेली नाही. पाऊस थांबला आहे. दोन्ही संघ मैदानात सराव करत आहेत. खेळपट्टीच्या वरच्या भागातून कव्हर्स काढण्यात आली आहेत. नाणेफेक काही वेळात होईल अशी आशा आहे.
UPDATE:
👉Toss to take place at 7:45PM IST
👉Start of Play at 8 PM IST#TATAIPL | #Qualifier2 | #GTvMI https://t.co/cIJJSar5Oy— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2023
मैदानाची स्थिती पाहून पंचांनी नाणेफेकीची नवीन वेळ ठरवली आहे. नाणेफेक संध्याकाळी 7:45 वाजता होईल आणि सामना रात्री 8:00 वाजता सुरू होईल.