मुंबई – मिर्झापूर वेब सिरीजमधील अनेक डायलॉग हिट झाले. या सिरीजमधील सर्वच पात्रे प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली. गुड्डू भैय्या,कालीन पंडित यांच्यासोबतच एक बोल्ड पात्र देखील खूप हिट झालं. बिना त्रिपाठीच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री रसिका दुग्गल नुकतीच तिच्या एका खुलाश्यामुळे कॅचर्चेत आली आहे. यावेळी रसिकाने साकारलेल्या बोल्ड भूमिकेबाबत भाष्य केले आहे.
‘मिर्झापूर’मध्ये रसिका दुग्गलने बिना त्रिपाठी या मनाने आणि शरीराने स्वतंत्र असलेल्या महिलेची भूमिका साकारली आहे. रसिका दुग्गल म्हणते, ‘प्रथम मला वाटले की कदाचित ही भूमिका अधिक कामुक किंवा स्टिरियोटाइपिकली बोल्ड व्यक्तीसाठी अधिक अनुकूल असेल. केवळ शारीरिक बोल्डनेस मांडणे समोर आहे परंतु मानसिक आणि शाब्दिक बोल्डेनस मांडण्याबाबत मी नर्व्हस होते असं अभिनेत्री सांगते.
अशी वेगळी बोल्ड भूमिका साकारण्यासाठी प्रेरणा कशी मिळाली याबाबत बोलताना रसिका म्हणते,’मिर्झापूर’च्या शूटिंगपूर्वी एका पार्टीत मी एका तरुणीला भेटले, जी माझी प्रेरणा बनली. साधी जीन्स आणि टी-शर्ट घातलेली ती तरुणी एका छोट्या शहरातील होती. ती गायिका होती. दिसायला अतिशय लाजाळू पण तिने गाणे सुरू करताच तिचे रूपांतर एका कामुक आणि दबंग महिलेत झाले जिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ती प्रतिमा माझ्या मनात राहिली आणि मिर्झापूरमधील त्या बोल्ड भूमिकेसाठी माझी प्रेरणा बनली असा खुलासा अभिनेत्रीने केला.
‘मिर्झापूर’ या वेबसिरीजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या मालिकेचा दुसरा भागही खूप गाजला. आता ‘मिर्झापूर सीझन 3’ लवकरच रिलीज होणार आहे. या मालिकेची कथा उत्तर प्रदेशातील मिर्झापूर शहरातील आहे. या मालिकेत पंकज त्रिपाठी कालीन भैय्याची भूमिका साकारत आहे. या मालिकेमुळे पंकज त्रिपाठी ओटीटी प्लॅटफॉर्मचा स्टार बनला आणि रसिका दुग्गललाही खूप प्रसिद्धी मिळाली. अली फजल, दिव्येंदू शर्मा, श्वेता त्रिपाठी, कुलभूषण खरबंदा यांसारख्या अनेक दमदार कलाकारांनी या मालिकेत काम केले आहे.