मुंबई – बॉलीवूड शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. या खास प्रसंगी किंग खानने सुहानाचा व्हिडिओ शेअर केला आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. व्हिडिओमध्ये सुहाना रोलर स्केट्स घालून गोल गोल फिरताना दिसत आहे. हा व्हिडिओ स्लो-मोमध्ये रेकॉर्ड करण्यात आला आहे, ज्यामध्ये सुहाना सुंदर हसताना दिसत होती.
View this post on Instagram
व्हिडिओमध्ये सुहानाने काळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि डेनिम जीन्स कॅरी केली आहे. व्हिडिओमध्ये ती खूप आनंदी दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना किंग खानने कॅप्शनमध्ये लिहिले की,’आज तुझा आनंद शोधण्याचा दिवस आहे… लव्ह यू बेबी.’ किंग खानच्या या पोस्टवर चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण सुहानाला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
वडिलांच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देताना सुहानाने लिहिले की, ‘लव यू द मोस्ट’. त्याचवेळी सुहानाच्या बेस्ट फ्रेंड्स शनाया कपूर आणि अनन्या पांडेनेही इन्स्टाग्रामवर पोस्ट करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
या चित्रपटात त्याच्यासोबत खुशी कपूर, अगस्त्य नंदा कपूर आणि वेदांग रैना देखील दिसणार आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. याशिवाय सुहाना खान न्यूयॉर्कच्या मेबेलाइन या ब्युटी ब्रँडची ब्रँड अॅम्बेसेडर देखील आहे.