मुंबई – दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा ‘सैराट’ हा मराठी सिनेमा सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. आजही या सिनेमाची क्रेझ कायम आहे. हा चित्रपट रिलीज होऊन सात वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त अभिनेता आकाश ठोसरने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
आकाशने इनस्टाग्राम अकाऊंटवर ‘सैराट’ सिनेमाच्या पोस्टरचा एक फोटो शेअर करत ”सैराट’ सिनेमाला आज सात वर्षे पूर्ण झाली…29 एप्रिल’, असे लिहिले आहे. त्याच्या या पोस्टला अनेकांची पसंती मिळत आहे. यावर ‘असा चित्रपट पुन्हा होणे नाही,’ ‘किती वेळा पाहिला तरी हा सिनेमा पुन्हा पाहावासा वाटतो,’ अशा कमेन्ट नेटकरी करत आहे. आजही या चित्रपटातील संपूर्ण कथा अनेकांच्या लक्षात आहे.
View this post on Instagram
या चित्रपटात जवळजवळ सर्वच कलाकार नवीन होते. पहिल्यांदाच त्यांनी सिनेक्षेत्रात काम केले होते. मात्र तरीही या कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावले होते. या चित्रपटातील ‘मराठीत सांगितलेलं कळत न्हाय…इंग्रजीत सांगू I love You’, या सारखे अनेक डायलॉग सुपरहिट ठरले होते.
बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. 29 एप्रिल 2016 रोजी ‘सैराट’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेता आकाश ठोसरने परश्याची, तर रिंकू राजगुरूने आर्चीची भूमिका निभावली होती. या चित्रपटातून एका रात्रीत दोघेही लोकप्रिय झाले होते.