पुणे (खडकवासला) – ग्रामसेवकाला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.पुण्यातील या प्रकरणानंतर आरोपीवर हवेली ग्रामीणच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हवेली तालुक्यातील खामगाव मावळचे ग्रामसेवक लक्ष्मण शिंगाडे हे आपल्या कार्यलयात काम करत होते. यावेळी आरोपी आनंद थोपटे याने तेथे येऊन शिंगाडे यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. २६ एप्रिल रोजी हा सर्व प्रकार घडला. यानंतर लक्ष्मण शिंगाडे यांनी हवेली ग्रामीणच्या पोलीस ठाण्यात धाव घेत रीतसर तक्रार दाखल केली.
यानुसार आरोप आनंद थोपटेवर शासकीय कामात अडथळा आणून शिवीगाळ करत मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी आपल्या कार्यालयात काम करत असताना आरोपी आनंद थोपटे हा इतर दोन जनांसह ग्रामपंचायत कार्यालयात आला. मी याच गावचा रहिवासी आहे. तुम्ही काल कागद दिला असता तर आमचे काम झाले असते.कागद द्यायला उशिर का केला ? असं म्हणत थोपटे यांनी शिवीगाळ व मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत सरकारी कामात अडथळा आणला असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.
याबाबत पोलिसांत ग्रामसेवक लक्ष्मण शिंगाडे यांनी फिर्याद दिली असून यात म्हटले आहे, दि. २६ एप्रिल रोजी रोजी फिर्यादी ग्रामसेवक हे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शासकीय काम करत असताना आरोपी आनंद थोपटे हा इतर दोन जणांबरोबर ग्रामपंचायत कार्यालयात आला .पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ऋतुजा मोहिते करत आहेत.