मुंबई – अभिनेत्री कंगना राणावत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. नुकतेच दलाई लामा यांच्या व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्यामुळे तिचा निषेध करण्यासाठी काही लोक जमले होते.
कंगनाने या घटनेचा व्हिडिओ इंस्टाग्रामच्या स्टोरीमध्ये शेअर केला हतोय. या स्टोरीमध्ये कंगनाने सांगितले की, ‘दलाई लामा आणि जो बिडेन यांच्या मैत्रीबद्दल ती काहीही बोलली तरी तिला कोणाच्याही भावना दुखावायच्या नाहीत.’
कंगना म्हणाली की, “बौद्ध लोकांचा एक गट पल्ली हिल कार्यालयाबाहेर निदर्शने करत आहे, मला कोणाला दुखवायचे नव्हते, मी फक्त विनोद करत होते.. कृपया माझ्या हेतूचा गैरसमज करून घेऊ नका” कंगनाने लिहिले की,’माझा बौद्ध धर्म आणि त्यांच्या पवित्रतेवर विश्वास आहे. दलाई लामा यांनी आपले संपूर्ण आयुष्य सार्वजनिक सेवेत घालवले आहे. मी कुणालाही वाईट बोलत नाही… कृपया लोकांनी या उन्हात उभे राहून निषेध करू नये. कृपया घरी जा कंगनाने हात जोडून एक इमोजीही लावला आहे.’ असं म्हणत कंगना माफी मागितली आहे.
कंगना तिच्या आगामी ‘इमर्जन्सी’ चित्रपटावर काम करत आहे. ती केवळ चित्रपटाचे दिग्दर्शनच करत नाही तर त्यात मुख्य भूमिकाही साकारत आहे. या चित्रपटात कंगना भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.