मुंबई – रॅपर-गायक बादशाहची तरुण वर्गात प्रचंड क्रेझ आहे. त्याची गाणी अनेक कार्यक्रमांमध्ये रंगत वाढवताना दिसतात. मात्र रॅपर बादशाह लवकरच लग्न करणार चर्चा रंगल्या होत्या. गर्लफ्रेंड ईशा रिखीबरोबर विवाहबंधनात अडकणार असल्याचे म्हंटले जात होते. पण या बातम्या खोट्या असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत स्वत: बादशाहाने खुलासा केला आहे.
सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत बादशाहाने संताप व्यक्त केला आहे. ‘प्रिय मीडिया, मी तुमचा आदर करतो, पण हे चुकीचं आहे. मी लग्न करत नाही. ज्याने हे वृत्त तुमच्यापर्यंत पोहोचवले त्याला चांगला मसाला शोधण्याची गरज आहे,’ असे त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे.
बादशाहा-ईशा रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या गेल्या वर्षी सोशल मीडियावर गाजल्या होत्या. मात्र, या जोडप्याने या बातम्यांवर आपली प्रतिक्रिया दिली नाही. अखेर लग्नाच्या चर्चा सुरू झाल्यानंतर बादशाहने यावर स्पष्टीकरण दिले.
दरम्यान, गायकाने पहिले लग्न जस्मिन मसिहशी केले होते. मात्र, 2020 मध्ये दोघेही वेगळे झाले. लग्नाच्या आठ वर्षांनी बादशाह व जस्मिन घटस्फोट घेतला होता. परंतु, आजपर्यंत त्यांच्या विभक्त होण्याचे कारण समोर आलेले नाही.