इंदोर – इंदोर येथील पटेल नगर परिसरातील श्री बेलेश्वर महादेव झुलेलेलाल मंदिरात विहिरीचे छत कोसळल्याने 25 हून भक्त विहिरीत पडले. घटनेनंतर लगेचच तेथे उपस्थित लोकांनी पडलेल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला, आतापर्यंत 12 जणांना वाचवण्यात यश आले आहे, तर उर्वरितांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मध्य प्रदेश: इंदौर के पटेल नगर इलाके में झूलेलाल मंदिर की बावड़ी गिरने से कई लोगों के फंसे होने की आशंका है। अधिक जानकारी की प्रतीक्षा है। pic.twitter.com/sznYKWsjtf
— ANI_HindiNews (@AHindinews) March 30, 2023
मिळालेल्या माहितीनुसार, परासीर मंदिरात असलेल्या राममंदिरात रामनवमीच्या पूजेसाठी लोक जमले होते, यावेळी तेथे मोठी गर्दी जमली होती. गर्दी इतकी जास्त जमली की, लोक विहिरीच्या छतावर चढले, त्यानंतर अचानक विहिरीचे छत कोसळले.
ओझ्यामुळे सुमारे 25 लोक विहिरीत पडले, त्यात महिला, पुरुष आणि लहान मुले व वृद्धांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्तही घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती मिळताच आमदार आकाश विजयवर्गीय हेही घटनास्थळी पोहोचले आहे.