फंड, पेन्शन यावर जप्ती आणता येणार नाही
नवी दिल्ली, दि. 22 – कर्मचाऱ्यांचा प्रोव्हिडंड फंड, पेन्शन व सक्तीच्या बचत योजनेतील गुंतवणूक जोपर्यंत सरकारच्या ताब्यात आहे तोपर्यंत त्यावर जप्ती आणता येणार नाही, असा निकाल आज सुप्रीम कोर्टाने दिला.
डोंगराळ भागात रेल्वे
नवी दिल्ली – डोंगराळ भागात व ईशान्येकडील राज्यांत निधी उपलब्ध होताच नवे लोहमार्ग बांधण्यात येतील असे राज्यमंत्री कुरेशी म्हणाले. डोंगराळ भाग रेल्वेने जोडण्यासाठी 255 कोटी रुपये लागतील.
छत्रपती शाहू महाराजांचे जन्मशताब्दी तिकीट
मुंबई – छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मशताब्दीनिमित्त पोस्ट खात्याने तिकीट काढावे यासाठी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण लवकरच दिल्लीला दळणवळण मंत्र्यांची भेट घेण्यास जाणार आहेत.
सामाजिक विषमता दूर करण्यासाठी झगडावे
पाटणा- शिक्षण संस्थांनी सामाजिक विषमता दूर करण्यासाठी झगडले पाहिजे, असे आवाहन केंद्रीय शिक्षणमंत्री नुरूल हंसन यांनी केले. शिक्षणाचा मोठा प्रभाव समाजावर असतो. त्याचा उपयोग करता येईल.