मुंबई – बॉलीवूड अभिनेता धर्मेंद्र लवकरच पुन्हा एकादा ऑनस्क्रीन कमबॅक करणार आहे. ही बातमी त्यांच्या चाहत्यांनाही आनंद देणारी आहे. वयाच्या ८७ व्या वर्षी धर्मेंद्र यांच्या ऑनस्क्रीन कमबॅकवर बॉबी देओलची यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धर्मेंद्र लवकरच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मधून कमबॅक करणार आहे.
बॉबी देओल म्हणाला,’माझे वडील धर्मेंद्र यांच्या चेहऱ्यावर चित्रपटाच्या सेटबघून आनंद दिसून येतो. धर्मेंद्र, हे 2018 च्या कॉमेडी चित्रपट ‘यमला पगला दीवाना – फिर से’ मध्ये मुलगा सनी आणि बॉबी देओलसोबत दिसले होते.’
करण जोहरच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात त्यांची महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. यापूर्वी, धर्मेंद्र नुकताच ZEE5 मालिका ‘ताज: डिव्हाइड बाय ब्लड’ मध्ये सूफी संत सलीम चिश्ती यांच्या भूमिकेत दिसले होते. त्याच्या ऑनस्क्रीन कमबॅकबद्दल बॉबी देओलने सांगितले की, “मी खूप उत्साही आहे. माझे वडील 87 वर्षांचे आहे, पण जेव्हाही ते शूटिंगवर असतात तेव्हा मला त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो… त्यांच्या वयात, काम मिळणे सोपे नाही, परंतु तरीही माझे वडील आवड म्हणून काही चांगल्या चित्रपट निर्मात्यांसोबत काम करत आहे, त्यामुळे मी आनंदी आहे. माझ्या वडिलांसाठी कामाचा प्रत्येक दिवस हा पहिला दिवस आहे”