मुंबई – काल भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे सामना पार पडला. यादरम्यान राज्याच्या राजकारणात सध्या चर्चेत असणारे दोन नेते मॅच पाहण्यासाठी एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. प्रत्येकालाच या मॅचची उत्सुकता होती. अशात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार हे मुंबईतील वानखेडे मैदानावर सामना पाहण्यासाठी एकत्र आल्याचे दिसून आले.
भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये राजकारणावरून सतत आरोप प्रत्योप होताना दिसून येतात. शिवाय रोहित पवार यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले राम शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात.त्यात राज्यातील सध्याचे राजकारण पाहता कधी कोणती नवी घटना घडेल हे सांगणे कठीण आहे. अशात हे दोन्हही नेते सोबत बसल्याचे दिसून आल्यानंतर राजकीय वर्तुळात याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
रोहित पवार यांनी यावेळेसचा फडणवीस यांच्यासोबतचा एक फोटो देखील शेअर केला आहे.”पक्षभेद विसरून सर्वांना एकत्र यायला भाग पाडतो तो खेळ असतो आणि महाराष्ट्रात नेहमीच असं खिलाडू वातावरण बघायला मिळतं” असं म्हणत रोहित पवार यांनी वानखेडे स्टेडियमवरील देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा फोटो ट्विट केला आहे.
पक्षभेद विसरून सर्वांना एकत्र यायला भाग पाडतो तो खेळ असतो आणि महाराष्ट्रात नेहमीच असं खिलाडू वातावरण बघायला मिळतं…
मुंबईत वानखेडे स्टेडियमवर इंडिया-ऑस्ट्रेलिया मॅचदरम्यान उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब आणि @MumbaiCricAssoc चे अध्यक्ष अमोल काळे यांच्यासोबतचा असाच एक क्षण…… https://t.co/D4bJ4EKM4W pic.twitter.com/vBC7Zb5SrT— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 17, 2023
मॅचमध्ये काय झालं
भारताला पहिल्या मॅचमध्ये विजय मिळवण्यासाठी १८९ धावांचं लक्ष देण्यात आलं होतं. भारताच्या फलंदाजांनी सावध सुरुवात करत कांगारुंची दमछाक केली. म्हणूनच ऑस्ट्रेलीयाविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्येच भारताचा दणदणीत विजय झाला. ३९.५ षटकात भारताने १९१ धावा करत ५ गडी राखून ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला.