मुंबई – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी अनिक्षा जयसिंघानी नावाच्या एका डिझायनरच्या विरोधात तक्रार दाखल केला आहे. तिला अटकही करण्यात आली आहे. अमृता फडणवीस मागच्या दीड वर्षापेक्षा जास्त काळ अमृता फडणवीस या अनिक्षाला ओळखतात. अमृता फडणवीस यांच्या घरीही अनिक्षा गेली होती.अनिक्षा ही सट्टेबाज अनिल जयसिंघानीची मुलगी आहे. तसेच तिचा भाऊ अक्षय जयसिंघानीलाही ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप पक्षावर विरोधी पक्षाकडून टीका केली जात आहे.
अशातच या संपूर्ण प्रकरणानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर आता सुषमा अंधारे यांनी ट्विट केले की,’विद्यमान गृहमंत्र्याच्या पत्नीच्या संदर्भात चौकशी सुरू आहे, त्यामुळे नैतिकता दाखवत, देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यायलाच हवा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. त्यांनी एक ट्वीट करत ही मागणी केली. या ट्विटबरोबर त्यांनी महाविकास आघाडीच्या काळातील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची प्रतही जोडली आहे.
सुषमा अंधारे यांचे ट्विट
माजी गृहमंत्री @AnilDeshmukhNCP यांनी चौकशी चालू असताना निष्पक्ष चौकशी व्हावी या हेतूने नैतिकता म्हणून पदाचा राजीनामा दिला होता. आत्ता जर विद्यमान गृहमंत्र्याच्या पत्नीच्या संदर्भात चौकशी चालू असेल तर अशीच नैतिकता दाखवत @Dev_Fadnavis यांनी राजीनामा द्यायलाच हवा.@ShivsenaUBTComm pic.twitter.com/Wwgt577j96
— SushmaTai Andhare (@andharesushama) March 17, 2023