नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुरुवारी कर्नाटकच्या दौऱ्यावर होते. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्या या दौऱ्याकडे पाहिले जात आहे. येत्या काही महिन्यांत राज्यात विधानसभेच्या 224 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. अमित शहा यांनी बल्लारीच्या सांडूर येथे जनसभेला संबोधित करताना काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.
राहुल गांधींचे ‘तुकडे-तुकडे’ गँगशी असलेल्या संबंधांवर देखील शहा यांनी यावेळी भाष्य केले. त्याचवेळी, आपल्या भाषणात शाह यांनी पीएम मोदींच्या नेतृत्वाची प्रशंसा केली आणि भारत दिवसेंदिवस शक्तिशाली होत चालला असल्याचे म्हंटले आहे.
Ballari,Karnataka| BJP is fighting for a complete majority in Karnataka.People of Karnataka are resolved to make lotus bloom again.On one side it’s Modi Ji’s BJP & on other side, it’s Rahul Baba’s tukde tukde gang Congress:Union Home Minister Amit Shah at ‘Vijay Sankalp Samavesh’ pic.twitter.com/4QLdKv0QEP
— ANI (@ANI) February 23, 2023
जाहीर सभेत अमित शाह यांनी कर्नाटकच्या जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्यावर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी जनतेला आश्वासन दिले की भाजप असे सरकार देईल जे भ्रष्टाचार मुक्त करेल आणि कर्नाटकला पाच वर्षात दक्षिण भारतातील पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवेल.
People of Karnataka are resolved to make lotus bloom again. Speaking at ‘Vijay Sankalp Samavesh’ in Ballari.
ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಕಮಲ ಅರಳಿಸಲು ರಾಜ್ಯದ ಜನರು ನಿರ್ಣಯಿಸಿದ್ದಾರೆ. ಬಳ್ಳಾರಿಯಲ್ಲಿ ವಿಜಯ ಸಂಕಲ್ಪ ಸಮಾವೇಶವನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತು. https://t.co/TJx6pE20BH
— Amit Shah (@AmitShah) February 23, 2023
कर्नाटकातील काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सांडूर येथे जाहीर सभेला संबोधित करताना अमित शहा यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्ष आणि जनता दल सेक्युलरवरही निशाणा साधला. घराणेशाहीचे राजकारण करणारे पक्ष सर्वसामान्यांसाठी कधीही चांगले काम करू शकत नाहीत, असेही ते म्हणाले. पंतप्रधानांचे कौतुक करताना शाह म्हणाले की, एकीकडे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप भारताला ताकदीच्या दिशेने घेऊन जात आहे. दुसरीकडे, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आहे, ज्याचा संबंध ‘तुकडे-तुकडे’ गँगशी आहे.