मुंबई – एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून पायाला भिंगरी लावून महाराष्ट्राची कामे करताना दिसून येतात. रात्र असो कि दिवस,कार्यकर्त्याला भेटणं असो वा एखादी महत्वाची मिटिंग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपला जास्तीत जास्त वेळ कार्यासाठी देण्याचा प्रयत्न करताना दिसतात. एरवी आपल्या शब्दांनी विरोधकांना घायाळ करणाऱ्या मुख्यमंत्री शिंदेंनी क्रिकेटच्या मैदानावर देखील जबरदस्त बॅटिंग केल्याचे पाहायला मिळाले. निमित्त होत एका क्रिकेट स्पर्धेच्या कायक्रमाच.
बाळासाहेबांची शिवसेना शाखा क्रमांक 218 द्वारे गिरगावमध्ये क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला थेट मुख्यमंत्र्यांनी हजेरी आळवत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. शिवसैनिकांनी केलेल्या आग्रहाखातर एकनाथ शिंदेंनी बॅट हातामध्ये घेतली आणि ते मैदानात दाखल झाले. क्रिकेटच्या निमित्ताने तरुण वर्गासोबत मिसळून मुख्यमंत्र्यांनी देखील मैदानात चांगलीच फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले.
सभागृहात ज्याप्रमाणे मुख्यमंत्री शिंदे विरोधकांवर तुटून पडतात अगदी तोच खिलाडी बाणा मुख्यमंत्र्यांचा यावेळी मैदानात पाहायला मिळाला. मुख्यमंत्र्यांनी मैदानात तब्बल एक ओव्हर खेळत प्रत्येक बॉलवर जोरदार प्रहार केल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी एकही चेंडू वाया घालवला नाही. प्रत्येक चेंडू टोलवून सीमारेषेपलीकडे पाठवण्याचा प्रयत्न यावेळी त्यांनी केला.
गिरगाव प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला.#EknathShinde #Cricket #Sport #ViralVideo pic.twitter.com/1rKHFCl38P
— Satish Daud (@Satish_Daud) January 26, 2023
स्पर्धेदरम्यान सुरु असलेल्या एका मॅचचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी टॉस देखील उडवण्यात आला. तसेच एका त्यापूर्वी पार पडलेल्या सामन्यातील उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूचा सन्मान देखील मुख्यमंत्र्याच्या हस्ते पार पडला. यानिमित्ताने बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सर्व स्थानिक पदाधिकारी आणि नेते उपस्थित होते.