तेल अविव, (इस्रायल) – इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेत्यान्याहू यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आपल्या मंत्रिमंडळातील एका प्रमुख मंत्र्याची हकालपट्टी केली आहे. मात्र यामुळे न्यायालयाची क्षमता आणि पंतप्रधानां दरम्यानचे मतभेद अधिकच वाढले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गृह आणि आरोग्य खात्याचे मंत्री आरेह देरी यांना मंत्रिमंडळातून हटवण्यात आले आहे, असे नेत्यान्याहू यांच्या कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
आरेह यांना करचुकवेगिरीच्या आरोपात गेल्या वर्षी दोषी ठरवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात राहता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. त्यानंतर आरेह यांना मंत्रिमंडळातून काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
Assam : ‘शाहरूख खान कोण आहे’ ते ठाऊक नाही – मुख्यमंत्री हिमंता सर्मा
इस्रायलमध्ये न्यायपालिकेच्या हक्कांच्या मुद्यांवरून सध्या तणाव निर्माण झाला आहे. कट्टर उजव्या विचारसरणीचे नेत्यान्याहू यांचे सरकार न्यायपालिका कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका होते आहे.