गुवाहाटी :– आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान याच्याविषयी अनभिज्ञता व्यक्त केली. शाहरूख खान कोण आहे? मला त्याच्याविषयी किंवा “पठाण’ या चित्रपटाविषयी काहीच माहिती नसल्याचे सर्मा यांनी म्हटले. त्यामुळे सर्मा यांना खरोखरीच शाहरूख ठाऊक नाही की त्यांनी ऍक्टिंग केली, अशा संभ्रमात पत्रकार पडले.
शाहरूखचा “पठाण’ हा चित्रपट 25 जानेवारीला देशभरात प्रदर्शित होणार आहे. एका गाण्यातील पेहरावाच्या रंगावरून तो चित्रपट काही दिवसांपूर्वी वादात सापडला. त्या पार्श्वभूमीवर, आसाममधील एका चित्रपटगृहासमोर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. त्यांनी पठाणची पोस्टर्स फाडून जाळली. त्या घटनेबाबत पत्रकारांनी सर्मा यांना काही प्रश्न विचारले.
उत्तर देताना सर्मा यांनी शाहरूख माहीत नसल्याचे म्हटल्यावर पत्रकार चक्रावले. शाहरूख बॉलीवूडचा सुपरस्टार असल्याचे पत्रकारांनी म्हटल्यावर सर्मा यांनी आणखीच मसालेवाईक प्रतिक्रिया दिली.
आसाममधील जनतेने हिंदी चित्रपटांची नव्हे; तर आसामी चित्रपटांची चिंता करावी, असे ते म्हणाले.