लॉस एंजेलिस – चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्या पहिल्या दोन मानवापैकी एक असलेले अमेरिकेचे अंतराळवीर एडविन ऑल्ड्रीन हे 93 व्या वर्षी विवाहबद्ध झाले आहेत. लॉस एंजेलिसमधील एका चोट्या समारंभात ऑल्ड्रीन यांचा त्यांची दीर्घकालापासूनची मैत्रिण डॉ. अँका. व्ही. फॉर यांच्याशी विवाह झाला.
शुक्रवारी ऑल्ड्रीन यांचा 93 वा वाढदिवस होता. याचदिवशी हा विवाह संपन्न झाला. स्वतऋ ऑल्ड्रीन यांनी पेसबुकवरच्या पोस्टमधून ही माहिती दिली आहे. ऑल्ड्रीन यांचा हा चौथा विवाह आहे.
आम्ही विवाहबद्ध झालो आहोत. आम्हाला अगदी किशोरवयीन असल्यासारखे वाटते आहे, असे ऑल्ड्रीन यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांनी आपल्या नववधूबरोबरचे अनेक फोटोदेखील शेअर केले आहेत. त्यांच्या या पोस्टला जगभरातून लाईक मिळाल्या आहेत.
20 जुलै 1969 रोजी अपोलो-11 या अंतराळ यानातून ऑल्ड्रीन आणि नील आम्रस्ट्रॉंग यांनी चंद्रावर प्रथम पूाल ठेवले होते. पहिल्यांदा आम्रस्ट्रॉंग यांनी आणि त्यांच्या पाठोपाठ ऑल्ड्रीन यांनी चंद्राच्या पृष्ठभागावर पाऊल ठेवले होते. मानवाला चंद्रावर पाठवून पुन्हा सुरक्षित परत आणण्याची अमेरिकेचे तत्कालिन अध्यक्ष जॉन केनेडी यांची महत्वाकांक्षा यामुळे पूर्ण झाली होती.