मुंबई – बॉलीवूड किंग खान म्हणजेच, अभिनेता ‘शाहरुख खान’ अनेक दिवसांपासून त्याच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. शाहरुख खान 2023 मध्ये त्याच्या तीन चित्रपटांसह बॉक्स ऑफिसवर धमाका करणार आहे. दिवाळीत शाहरुखच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच 2 नोव्हेंबरला अभिनेत्याने त्याच्या बहुप्रतिक्षित ‘पठाण’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला होता. तेव्हा पासून त्याचे फॅन्स या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
दरम्यान, अभिनेत्या जेव्हा पठाण चित्रपटाचा टिझर शेअर केला होता, तेव्हा पासूनच चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. अश्यातच या चित्रपटाचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख खान जबरदस्त ऍक्शन करतांना दिसून येत आहे. काही युजर्सनी हा व्हिडीओ शेअर करत हा पठाणचा ट्रेलर असल्याचा दावा केला जात आहे.
हा व्हिडीओ समोर येताच मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. मात्र, या व्हिडिओला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे हा खरंच हा पठाण चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर आहे का? असं देखील नेटकरी म्हणत आहे. तसेच, या सर्व प्रकरणावर मेकर्सनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीय.
#Pathaantrailer#pathaan
Trailer leaked 🤯 !! pic.twitter.com/mq0zXAqWtL— Kanchana Run_out 🕓 (@KanchanaOut) January 2, 2023
नुकतंच, शाहरुखने आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ‘पठाण’ चित्रपटाच्या ट्रेलरची अधिकृत तारीख सांगितली आहे. त्यामुळे अश्यातच हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. शाहरुख खानने आपल्या पोस्ट मध्ये “तारीख लिहून ठेवा… ‘पठाण’चा ट्रेलर 10 जानेवारी, 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे’. असं म्हंटलं आहे.