मुंबई – भारतीय क्रिकेट संघातील धडाकेबाज खेळाडू ऋषभ पंतच्या कारला काल भीषण अपघात झाला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला आहे. दिल्लीहून ऋषभ घरी येत असताना त्याच्या कारला हा भीषण अपघात झाल्याचे समोर आले होते. या अपघातानंतर सोशल मीडियावर अनेकांनी ऋषभ लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना सुरु केल्याचे दिसून आले. यासोबतच ऋषभ आणि क्रिकेटर शिखर धवन यांचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
या व्हिडिओमध्ये ऋषभ आणि शिखर धवन गप्पा मारताना दिसत आहेत. यावेळी ऋषभ शिखराला विचारतो तुम्ही मला काय ऍडव्हाइस द्याल ? त्यावर शिखर धवन म्हणतो, “गाडी हळू चालवत जा” त्यावर ऋषभ पुन्हा तुमचा हा सल्ला मी नक्की ऐकेल असं म्हणताना दिसत आहे. एका युजरने शिखर धवनने ऋषभला बरोबर ऍडव्हाइस दिले असल्याचे म्हणत हा व्हिडीओ ट्विटवर शेअर केला आहे.
Shikhar Dhawan gave Rishabh Pant right advice about driving. pic.twitter.com/XxFRE5K74j
— Ami ✨ (@kohlifanAmi) December 30, 2022
कसा झाला अपघात नेमका
दिल्ली-डेहराडून महामार्गावर रेलिंगला धडकल्यानंतर ऋषभच्या कारला आग लागली होती. त्यानंतर परिसरातील उपस्थितांनी त्याला गाडीतून बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले.या अपघातात ऋषभच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर ऋषभला डेहराडूनमधील रुग्णालयात जखमी अवस्थेत दाखल करण्यात आलं होत.
पंतचा अपघात झाल्याची माहिती समोर येताच उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना त्याच्या उपचारासंदर्भात विशेष निर्देश दिले होते . उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी अधिकाऱ्यांना पंतच्या उपचारासाठी सर्व सुविधा पुरवण्याचे आदेश दिले होते. .तसेच वेळ पडल्यास त्याच्यासाठी एअर अॅम्ब्युलन्सचीही सेवा पुरवा असे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितलं आहे.