Rishabh Pant : भारताचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा अपघात होऊन तब्बल एक वर्ष पूर्ण झालं आहे. आज म्हणजेच शनिवारी (30 डिसेंबर) अपघाताला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल, आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्सने एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे. पंत या संघाचा कर्णधार आहे. दिल्ली कॅपिटल्सने म्हंटले की तो धमाकेदार पुनरागमन करण्यास तयार आहेत. आयपीएलच्या आगामी हंगामात तो संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. फ्रँचायझीने त्याला कायम ठेवले आहे.
दिल्ली कॅपिटल्सने लिहिले- त्या भयंकर रात्रीनंतर ३६५ दिवस उलटले आहेत. तेव्हापासून विश्वास, कठोर परिश्रम द्वारे तो खेळात जोरदार पुनरागमन करेल कारण तो कधीही हार न मानणारा खेळाडू आहे. धाडसी, उत्साही ऋषभ पंत 2.0 लवकरच अॅक्शन करताना दिसणार आहे. डेव्हिड वॉर्नर, अक्षर पटेल, रिकी पाँटिंग आणि सौरव गांगुली यांनी दिल्ली कॅपिटल्सने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांचे मत व्यक्त केले.
अक्षर पटेलने सांगितली स्टोरी
अक्षर पटेलने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “सकाळी सात किंवा आठ वाजता प्रतिमा दीदींनी मला कॉल केला. त्याने मला विचारले की तू ऋषभशी शेवटचे कधी बोलली होतीस. मी म्हणालो की मी त्याला कॉल करणार आहे,त्यांनी मला सांगितले की तुझ्याकडे ऋषभच्या आईचा फोन नंबर असेल तर पाठवा. आधी वाटलं की हा भाऊ गेला. बीसीसीआय आणि शार्दुलसह सर्वांनी मला फोन केला. पंत माझ्याशी शेवटचे बोलला असतील हे सर्वांना माहीत होते. मी पंतशी बोललो. फोन केल्यावर कळलं की सगळं ठीक आहे. त्याला दुखापत झाली आहे. यानंतर माझ्या जीवात जीव आला. तो आता लढणार हे मला माहीत होतं.”
View this post on Instagram
पंतचा अपघात कसा झाला?
30 डिसेंबर 2022 रोजी पंत कारने आपल्या घरी जात होता आणि अपघाताच्या वेळी तो एकटाच होता. रुरकीच्या नरसन सीमेवर हम्मादपूर झालजवळ त्याची मर्सिडीज कार नियंत्रणाबाहेर गेली आणि रेलिंगला धडकली. यानंतर कारने पेट घेतला आणि उलटली. गाडी चालवताना पंत झोपी गेला होता. यानंतर त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. पंतच्या डोक्याला, पाठीवर आणि पायाला जखमा होत्या.