IND vs BAN – भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात झाली. नाणेफेकीवेळी जेव्हा भारतीय संघाच्या सामन्यासाठीच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण पहिल्या कसोटी सामन्यात दमदार गोलंदाजी करून सामनावीर पुरस्कार मिळविणाऱ्या कुलदीप यादवला या सामन्यासाठी संघाबाहेर ठेवण्यात आले. दरम्यान, चांगली कामगिरी करत असताना कुलदीपला संघाबाहेर बसवणे ही अविश्वसनीय बाब असल्याचे सुनील गावस्कर यांनी म्हटले आहे.
BBL । ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू वेड पुन्हा चुकीचा वागला; फाफ डुप्लेसीसला त्याचा राग आल्याने…
दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी कुलदीप यादवला संघाबाहेर ठेवले असून त्याच्या जागी १२ वर्षानंतर कसोटी संघात पुनरागमन करणाऱ्या जयदेव उनाडकट याला संधी देण्यात आली आहे. मात्र, कुलदीपला संघाबाहेर ठेवण्याच्या निर्णयावर भारताचे माजी क्रिकेटर आणि सध्याचे समालोचक सुनील गावस्कर यांनी नाराजी व्यक्त केली.
BBL । ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू वेड पुन्हा चुकीचा वागला; फाफ डुप्लेसीसला त्याचा राग आल्याने…
गावस्कर यांनी म्हटले की, “मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूला संघाबाहेर ठेवणे हे अविश्वसनीय आहे. या निर्णयासाठी ‘अविश्वसनीय’ हा एकमेव शब्द मी वापरू शकतो. याबाबतीत मी अत्यंत कठोर शब्द वापरू शकतो, परंतु तुम्ही मागील सामन्यात ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरलेल्या खेळाडूला बाहेर बसवता हे अविश्वसनीय आहे. महत्वाचं म्हणजे त्याने मागील सामन्यात २० पैकी ८ बळी घेतले होते.”
कुलदीप यादवच्या जागी संधी मिळालेल्या जयदेव उनाडकटने सामन्यात चांगली कामगिरी केली. त्याने झाकीर हसनला बाद करत भारतीय संघासाठी पहिला बळी मिळवून दिला. पहिल्या डावात उनाडकटने १६ षटके गोलंदाजी केली आणि ५० धावा खर्च करून २ फलंदाजांना बाद केले.