नवी दिल्ली – जीएसटी परिषदेच्या आज झालेल्या बैठकीत कोणत्याही वस्तूवर करवाढ करण्यात आले नाही. मात्र जैवइंधनावरील कर 18 टक्क्यावरून पाच टक्के करण्यात आला आहे.
साखर कारखाने पेट्रोलियम कंपन्यांना इथेनॉलचा पुरवठा करतात. हे इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळले जाते. या जैवइंधनावर पूर्वी 18% कर होता. तो आता पाच टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांच्या ताळेबंदात सुधारणा होण्यास मदत होणार आहे.
तंबाखू आणि गुटक्यावरील कर रचनेत बदल करण्यासंदर्भात निर्णय घेणे अपेक्षित होते मात्र या विषयावर आज चर्चा झाली नाही. पान मसाला आणि गुटखा विक्रीवेळी कर चूक वेगळी केली जाते. ही कर चूकवेगीरी टाळण्यासाठी आजच्या परिषदेत निर्णय घेतला जाण्याची अपेक्षा होती. मात्र वेळेअभावी या विषयावर चर्चा होऊ शकली नाही.
ऑनलाईन गेमिंग संदर्भातील कररचनेवर आज चर्चा होणे अपेक्षित होती. या विषयावरही चर्चा होऊ शकले नाही. यासंदर्भातील मंत्री समितीचा अहवाल केवळ दोन दिवसांपूर्वी अर्थ मंत्रालयाला मिळाला. या अहवालाची प्रत राज्यांच्या अर्थमंत्र्यांना देण्यात आली नव्हती. त्यामुळे या विषयावर आज चर्चा होऊ शकली नाही.
जीएसटी परिषदेने कर चूक वेगळी केल्यानंतर संबंधित उद्योगावर गुन्हे दाखल करण्याची यंत्रणा कार्यान्वित केली होती. त्यामुळे अनेक छोट्या बाबीवरही गुन्हे दाखल होत होते. आता दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त मोठ्या कर चुकवेगिरीवरच अशा प्रकारचे गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
मात्र एक कोटी रुपया पेक्षा जास्त किमतीच्या खोट्या इन्व्हाईस बद्दल फौजदारी गुन्हा दाखल होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. अगोदर माहिती घेण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्याला अडथळा निर्माण केल्यास गुन्हा दाखल होत असे. आता असा गुन्हा दाखल होणार नाही. अगोदर पुरावा बदलण्याचा प्रयत्न केल्यास गुन्हा दाखल होत होता. मात्र आता गुन्हा दाखल होणार नाही. अगोदर माहिती न दिल्यास गुन्हा दाखल होतात आता या विषयावर फौजदारी गुन्हा दाखल होणार नाही असे सांगण्यात आले.