नवी दिल्ली – बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच, अभिनेता ‘शाहरुख खान’ सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. नुकतंच अभिनेत्यानं त्याच्या आगामी “डँकी’ चित्रपटाचं सौदी अरेबिया मधील शूटिंग पूर्ण केलं आहे. स्वतः शाहरुख खानने याबद्दल माहिती दिली आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर या संदर्भातील एक पोस्ट देखील शेअर केली आहे. व्हिडिओमध्ये शाहरुखने चित्रपटातील कलाकार आणि क्रूचे आभार मानले आहेत. तसेच सौदी अरेबियाच्या संस्कृती आणि चित्रपट मंत्रालयाचे आभार मानले असल्याचं पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
दरम्यान, चित्रपटाचं शुटिंग संपल्यानंतर शाहरुखने मक्का या पवित्र शहराला भेट दिली आणि मक्का येथे इस्लामिक तीर्थक्षेत्र उमराह केल्याचं म्हंटलं आहे. येथील त्याचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, फॅन्सने या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. या फोटोंमध्ये शाहरुख खान पूर्णपणे वेगळ्या (सफेद) ड्रेसमध्ये दिसत आहे.
View this post on Instagram
फोटोमध्ये शाहरुख पवित्र ठिकाणी लोकांच्या भोवती दिसला आहे. फॅन अकाउंटवरून अभिनेत्याचे दोन फोटो शेअर करण्यात आले आहेत, जे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. दरम्यान, शाहरुख लवकरच ‘पठाण’, ‘जवान’ आणि डँकी या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. फॅन्स देखील आपल्या लाडक्या अभिनेत्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे.