NZ vs IND – भारतीय संघाने रविवारी झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा ६५ धावांनी पराभव करत ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दोन्ही संघांमधील पहिला टी-२० सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे दुसऱ्या सामन्यावर सर्वांचेच लक्ष्य होते. या सामन्यात नाफेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करावी लागली.
#NZvsIND | रोहित शर्माने बाहेर ठेवले, मात्र हार्दिकने खेळवताच पठ्ठ्याने केली कमाल
सलामीला आलेला ऋषभ पंत ६ धावा करून तंबूत परतला. यानंतर ईशान किशनने सावध फलंदाजी करत ३६ धावांचे योगदान दिले. ईशान बाद झाला तेव्हा टीम इंडियाची धावसंख्या ६९ वर २ बाद अशी होती. यानंतर श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव खेळपट्टीवर होते. मात्र, श्रेयस अय्यर १३ धावांवर असताना तो स्वतःच्याच चुकीने बाद झाला. सूर्यकुमारने त्याची फटकेबाजी कायम ठेवत शतकीय खेळी केली आणि भारताला १९१ धावसंख्येवर पोहोचवले.
#NZvsIND | रोहित शर्माने बाहेर ठेवले, मात्र हार्दिकने खेळवताच पठ्ठ्याने केली कमाल
या मालिकेतील पहिला सामना पावसाने धुवून लावला होता. त्यामुळे रविवारचा ( NZ vs IND ) दुसरा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा होता. सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने गोलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला होता. भारताने सूर्यकुमारच्या ५१ चेंडूत १११ धावांच्या जोरावर २० षटकांत १९१ धावा केल्या. प्रत्युत्तरात १९२ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ १२६ धावांवरच सर्वबाद झाला. यजमानांकडून विल्यमसनने सर्वाधिक ६१ धावांची खेळी केली.
OH NO! Unbelievable! Shreyas Iyer has been dismissed after trodding back onto his stumps!
🇮🇳 108/3 (12.5)
FOLLOW LIVE:
👉 https://t.co/R46SbXgG6Q 👈#NZvIND | #INDvNZ pic.twitter.com/Ghmsb6xwlr— 🏏Flashscore Cricket Commentators (@FlashCric) November 20, 2022
दरम्यान, सूर्यकुमार आणि श्रेयस मैदानावर खेळत असताना १३व्या षटकात न्यूझीलंडचा लॉकी फर्ग्युसन गोलंदाजी करत होता. या षटकातील त्याच्या चौथ्या चेंडूवर श्रेयस दुर्दैवी पद्धतीने बाद झाला. फर्ग्युसनने हाफ टप्प्यावर टाकलेला चेंडू श्रेयसने बॅकफूटवर येऊन खेळला. मात्र यावेळी त्याच्या पायाचा स्टंपशी स्पर्श झाला आणि बेल्स पडल्या आणि तो हिट विकेट ठरला.
Out of #ShreyasIyer 3rd wkt gone #INDvsNZ pic.twitter.com/Ky2LnEpTEC
— Subhrajit Biswal (@Subhraj63040234) November 20, 2022