NZ vs IND – भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज टी-२० मालिकेतील दुसरा सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने ६५ धावांनी विजय मिळवला. फलंदाजीमध्ये सूर्यकुमार यादवने यजमानांना चांगलेच झोडपून काढत झंझावाती शतक ठोकले. सूर्यकुमारच्या ५१ चेंडूत ११ चौकार आणि ७ षटकारांसह १११ धावांच्या बळावर भारतीय संघाने १९१ धावा केल्या होत्या. २०२२ या वर्षात सूर्यकुमारच्या बॅटने प्रत्येक संघांच्या गोलंदाजांना चोप दिला आहे. त्याने टी-२० विश्वचषकातील दबदबा या मालिकेतही कायम राखला आहे. सूर्यकुमारच्या व्यतिरिक्त संघाचा अष्टपैलू खेळाडू दीपक हुडानेही या सामान्यत दमदार कामगिरी केली.
#NZvsIND | सूर्यकुमारच्या जबदस्त शतकाने भारताचा विजय, गोलंदाजांची उत्कृष्ट कामगिरी
दीपक हुडाला टी-२० विश्वचषकासाठी संघात स्थान देण्यात आले होते, मात्र रोहित शर्माने त्याला फक्त साऊथ आफ्रिका विरुद्धच्या सामन्यातच खेळवण्यात आले. त्या सामन्यात तो फलंदाजीत अपयशी राहिला होता. दीपक हुडा फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही संघाच्या अत्यंत उपयोगी ठरू शकतो हे त्याने आजच्या ( NZ vs IND ) सामन्यातून दाखवले आहे. कारण न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात त्याला फलंदाजीत ( शून्य धावा ) अपयश आले, मात्र त्याने गोलंदाजीत न्यूझीलंडच्या खालच्या फळीतील फलंदाजांना झटपट बाद केले. त्याने २.५ षटकांत १० धावा खर्च करत ४ गडी बाद केले.
#NZvsIND | सूर्यकुमारच्या जबदस्त शतकाने भारताचा विजय, गोलंदाजांची उत्कृष्ट कामगिरी
जसप्रीत बुमराहाचा विक्रम मोडला
हुडाने ( NZ vs IND ) सामन्याच्या दुसऱ्या डावातील १३व्या षटकात न्यूझीलंडचा प्रमुख फलंदाज डॅरिल मिशेल याला बाद केले. त्यांनतर शेवटी १९व्या षटकात गोलंदाजी करताना त्याने दुसऱ्या, तिसऱ्या आणि पाचव्या चेंडूवर अनुक्रमे ऍडम मिल्ने, ईश सोधी आणि टिम साउथी यांना तंबूत पाठवले. यादरम्यान तो गोलंदाजीत हॅट्रिक मिळवण्यापासून थोडक्यात चुकला. यावेळी त्याने अशी कामगिरी करताना जसप्रीत बुमराहच्या न्यूझीलंडच्या धर्तीवर भारतीय गोलंदाजाकडून सर्वश्रेष्ठ कामगिरीला मोडीत काढले आहे. बुमराहने याअगोदर न्यूझीलंड विरुद्ध त्यांच्याच देशात १२ धावा देऊन ३ बळी अशी कामगिरी केलेली आहे.
For India In T20Is
Best Bowling Fig in NZ
4/10 – Deepak Hooda*
3/12 – Jasprit Bumrah
3/28 – Krunal Pandya #INDvsNZ— CricBeat (@Cric_beat) November 20, 2022
टी-२० विश्वचषकात हुडासह चहलकडे रोहितचे दुर्लक्ष
संपूर्ण टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय कर्णधार रोहित शर्माने युझवेन्द्र चहल याला खेळवले नाही. त्याचवेळी इतर संघात लेगस्पिनर खेळाडूंना खेळवले जात होते. त्यापैकी काहींनी संघासाठी दमदार कामगिरी केली. चहलला एकाही सामन्यात संधी का देण्यात आली नाही? असा सवालही चाहत्यांच्या मनात निर्माण झाला होता. मात्र आता न्यूझीलंडविरुद्धच्या ( NZ vs IND ) सामन्यात चहलने चांगली कामगिरी करत ४ षटकांत २६ धावा देत ग्लेन फिलिप्स आणि जिमी निशाम यांना बाद केले. तर दुसरीकडे हुडाने गोलंदाजीत कमाल दाखवत खालच्या फळीतील फलंदाजांना झटपट बाद केले.