वॉशिंग्टन – अमेरिकेच्या संसदेत डेमोक्रॅटिक पक्षाची पकड आता ढिली होऊन डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे बहुमत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या प्रशासनापुढील समस्या अधिक वाढू शकतात.
सध्या डेमोक्रॅटिक पक्षाची पकड संसदेच्या दोन्ही सभागृहांवर आहे. मात्र मध्यावधी निवडणुकांनंतर हे चित्र बदललेले दिसण्याची शक्यता आहे. दोनपैकी एका सभागृहातील बहुमत डेमोक्रॅटिक पक्षाला गमवावे लागण्याची शक्यता असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
संसदेच्या प्रतिनिदीगृहाततील 435 सदस्यांसाठी आणि सिनेटमदील 35 सदस्यांसाठी आज मतदान झाले. याशिवाय अमेरिकेतील एकूण 50 पैकी 35 राज्यांमध्ये गव्हर्नरांचीही निवड करण्यात येणार आहे. तब्बल 42 दशलक्ष मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मतदारांना प्रत्यक्ष उपस्थित राहून मतदान करण्याऐवजी ईमेल द्वारे किंवा टपालाद्वारे मतदान करण्याची अनुमती देण्यात आली होती.
India’s G20 presidency : जी-20 अध्यक्षपदाचे बोधचिन्ह, आणि संकेतस्थळाचे अनावरण
अखेरच्या टप्प्यात डेमोक्रॅटिक पक्षाकडून माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनीही उमेदवारांसाठी प्रचार केला. तर रिपब्लिकन प7ाच्या उमेदवारांसाठी ट्रम्प यांनी आक्रमक प्रचार केला होता.