लोकनियुक्त सरपंचपदी आरती यादव : श्री शंभो ग्रामविकास आघाडीला तीन जागा
भुलेश्वर – पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस येथील झालेल्या पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ज्ञानेश्वर यादव यांच्या श्री भुलेश्वर ग्रामविकास परिवर्तन पॅनेलने सरपंच पदासह आठ जागा जिंकत ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता स्थापन केली आहे. तर अरुण यादव यांच्या श्री शंभो ग्रामविकास आघाडीला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले.
श्री भुलेश्वर ग्रामविकास पॅनलचे पुरंदर तालुका युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष ज्ञानेश्वर यादव यांच्या पत्नी आरती यादव तर श्री शंभो ग्रामविकास आघाडीकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी सरपंच अरुण यादव यांच्या पत्नी मनीषा अरुण यादव यांच्यामध्ये सरपंचपदासाठी लढत झाली. यामध्ये आरती यादव 335 चे मताधिक्य घेत सरपंचपदावर विराजमान झाल्या आहेत.
पुरंदर तालुका तहसीलदार कार्यालयामध्ये निकाल जाहीर करताच माऊली यादव यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला सासवडवरून गावात आल्यानंतर कार्यकर्त्यांसह श्री भुलेश्वराचे दर्शन घेऊन ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरामध्ये विजय सभा घेतली. यावेळी नवनिर्वाचित सरपंच आरती यादव म्हणाल्या की, जनतेने दिलेल्या संधीच सोन करून येणाऱ्या पाच वर्षांमध्ये निपक्षपातीपणे गावचा विकास करणार असल्याचे नमूद केले.
विजयी उमेदवार
श्री भुलेश्वर ग्रामविकास परिवर्तन पॅनेल : लोकनियुक्त सरपंच : आरती यादव. सदस्य : इंदुबाई कामठे, शरद यादव, संगिता इंदलकर, अशोक यादव, सविता गद्रे, सुखदेव मराठे, मंगल मगर, अर्चना बोरावके. श्री शिवशंभो ग्रामविकास आघाडी : दीपक रामदास यादव, दीपक उत्तम यादव, छाया यादव.