T20 WorldCup 2022 – भारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायनल सामन्यात ऋषभ पंतचा ( Rishabh Pant ) संघात समावेश केला जाण्याची दाट शक्यता आहे. याबाबतचे संकेत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीच दिले आहेत. झिम्बाब्वेविरुद्ध सामन्यात दिनेश कार्तिकच्या जागी ऋषभ पंतला संघात खेळवण्यात आले होते. मात्र त्याला या सामन्यात काही खास कामगिरी करता आली नाही. भारतीय संघाला मोठ्या धावसंख्येची आवश्यकता असताना पंत केवळ ३ धावा करून बाद झाला होता.
एबी डिव्हिलियर्स खळतोय मुंबईच्या गल्लींमध्ये क्रिकेट; पहा ‘हा’ व्हिडीओ
झिम्बाब्वेविरुद्ध सामन्याअगोदर ऋषभ पंतला ( Rishabh Pant ) एकाही सामन्यात खेळवले नव्हते. दरम्यान, ऋषभ पंतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मॅच पाहण्यासाठी आलेल्या एका प्रेक्षकाकडून त्याला उर्वशी रौतेलाचं नाव घेत डिवचल्याचे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये एक प्रेक्षक पंतला म्हणतो की, भावा तुला उर्वशी बोलवत आहे.” यावर पंत रागावला आणि म्हणाला, बोलवत आहे तर जा मग. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
भारतीय संघाचा सेमीफायनल सामना इंग्लंडशी खेळला जाणार आहे. हा सामना १० नोव्हेंबरला गुरुवारी ऍडिलेडच्या मैदानावर खेळला जाणार आहे. मात्र या सामन्याअगोदर यष्टीरक्षक म्हणून संघात ऋषभ पंत ( Rishabh Pant ) खेळणार की, दिनेश कार्तिक याबाबत चाहत्यांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. त्यासोबतच संघात कोणता फिरकी गोलंदाज खेळणार यावरही चर्चा सुरु आहे. युझवेन्द्र चहलला रविचंद्रन अश्विनच्या जागी खेळवले जाईल असे म्हटले जात आहे. मात्र यंदाच्या या स्पर्धेत चहलला आजून एकही सामन्यात खेळवलेले नाही.