आजच्या दसरा मेळाव्यातील भाषणांवरून दोन्ही गटांची पुढील दिशा आणि राजकारण ठरणार आहे. त्यामुळे आजचा दिवस आणि हा मेळावा शिंदे आणि ठाकरे दोन्हींसाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. या मेळाव्यांसाठी जनता कोणाच्या बाजूने कौल देणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे. दोन्ही गटांतील मेळाव्याच्या हालचालींना वेग आला आहे. कार्यकर्ते तसेच काही प्रमुख नेत्यांची भाषणे सुरु झाली आहेत.मात्र सर्वांना ऐकायची आहेत अशी दोन मुख्य भाषणे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. दरम्यान आपल्या दसरा मेळाव्याला संभोधित करण्यासाठी उद्धव ठाकरे साडेसात वाजता मातोश्रीवरून निघणार आहेत.
शिंदे गटाकडून देखील अगोदर काही मुख्य नेत्यांची भाषणे होणार आहेत. यामध्ये आमदार शहाजी बापू पाटील, रामदास कदम यांची भाषणे होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मुख्यमंत्री जनतेला संभोधित करतील. तर ठाकरे गटाकडून विधानसभा गाजवणारे भास्कर जाधव यांचे धडाकेबाज भाषण होण्याची शक्यता आहे. दुपारी दोन वाजल्या[पासून दोन्ही ठिकाणी कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली होती. आता जवळपास दोन्ही गटांच्या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्याचे दिसत आहे. ( Dasara melava 2022 Upadate Timing of CM Eknath Shinde Speech On BKC Ground )
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सात वाजता बीकेसी मैदानावर पोहोचतील आणि आठ ते सव्वा आठच्या दरम्यान ते आपल्या भाषणाला सुरुवात करतील अशी शक्यता आहे. तर दुसरीकडे दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे साडेसात वाजेपर्यंत पोहोचतील आणि पावणे आठच्या दरम्यान आपल्या भाषणाला सुरुवात करतील अशी शक्यता आहे. ठाकरे यांच्या बाजूने बाळासाहेबांना मानणारा मोठा समुदाय एकत्र आला आहे. तर शिंदे यांच्या बाजूने त्याच्या गटातील आमदारांच्या मतदार संघातून मोठ्या प्रमाणात जनता मुंबईत मेळाव्याला पोहोचली आहे.