वाघोली (प्रतिनिधी) – वाघोली (तालुका हवेली) येथील ऑक्सि अल्टीमा आणि सिद्धांत डीव्हाइन या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या रहिवाशांना आमदार अशोक पवार यांनी दिलेला शब्द पाळत रस्त्याचे आणि स्ट्रीट लाइट्सचे काम त्वरित सुरू करून एक नवा आदर्श उभा केला आहे.
आमदार अशोक पवार यांच्या हस्ते वाघोली केसनंद रोड येथील ऑक्सि अल्टीमा आणि सिद्धांत डीव्हाइन या सहकारी गृहनिर्माण संस्थांना केसनंद रोडला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाचे भूमीपुजन आमदार पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी वाघोली गावातील राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र सातव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, माजी सरपंच वसुंधरा उबाळे, ज्योती पाचर्णे, माजी उपसरपंच महेंद्र भाडळे, कैलास सातव, शिवदास उबाळे, बाळासाहेब सातव, गणेश बाळासाहेब सातव,सुनील जाधवराव आदी मान्यवर उपस्थित होते.
या रस्त्यावर स्ट्रीट लाइट्स बसविण्याचे देखील काम यावेळी सुरू करण्यात आले. सदर कामास माजी उपसरपंच महेंद्र भाडळे यांनी स्वखर्चाने भूमिगत पाईप आणि स्ट्रीट लाइट्स चे पोल बसविले याबद्दल आमदार पवार यांनी भाडळे यांचे कौतुक केले.