नवी दिल्ली – हैदराबादचे खासदार आणि AIMIM नेते असदुद्दीन ओवेसी यांनी सोशलवर व्हिडिओ शेअर करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि TMC नेत्या ममता बॅनर्जी यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) स्तुती केल्याबद्दल टीका केली आहे.
In 2003 too Mamata had called RSS “patriots”. In turn RSS had called her “Durga”. RSS wants Hindu Rashtra. Its history is full of anti-Muslim hate crime. She’d defended BJP govt in Parliament after Gujarat pogrom. Hope TMC’s “Muslim faces” praise her for her honesty & consistency https://t.co/45LKZ7aI4s
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) September 1, 2022
ते म्हणाले,’2003 मध्येही ममतांनी आरएसएसला ‘देशभक्त’ म्हटले होते, त्या बदल्यात संघाने त्यांना ‘दुर्गा’ म्हटले होते. त्याचबरोबर गुजरात दंगलीनंतर त्यांनी संसदेत भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा बचावही केला.’ दरम्यान, आरएसएसमध्ये असे अनेक कार्यकर्ते आहेत ज्यांना भाजप आवडत नाही, असे ममता काल म्हणाल्या होत्या.
यावर असदुद्दीन ओवेसी यांनी व्हिडिओ पोस्टला उत्तर देताना सांगितले की, “2003 मध्येही ममता बॅनर्जी यांनी आरएसएसला ‘देशभक्त’ म्हटले होते. त्या बदल्यात आरएसएसने तिला ‘दुर्गा’ म्हटले. आरएसएसला हिंदु राष्ट्र हवे आहे. पण त्यांचा इतिहास मुस्लिमविरोधी द्वेषपूर्ण गुन्ह्यांनी भरलेला आहे. गुजरात हत्याकांडानंतर त्यांनी संसदेत भाजप सरकारचा बचाव केला होता. आशा आहे की TMC चे “मुस्लिम चेहरे” त्यांच्या या विधानांवरून त्यांची प्रशंसा करणार नाही.’