नवीदिल्ली- महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. आपल्या ट्विटच्या माध्यमातून ते अनेकदा जनजागृतीचा संदेश देतात. अशातच गणेश चतुर्थीच्या निमित्ताने त्यांनी एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यातून समाजालाही मोठा संदेश मिळतो. व्हिडिओत त्यांनी एक बस ड्रायव्हर आणि त्याच्यासोबत चाललेल्या गणपती बाप्पाची गोष्ट सगळ्यांना दाखवली आहे.
व्हिडीओत भगवान गणेश ड्रायव्हरच्या शेजारी बसलेले दिसत आहे. यावेळी फक्त ड्रायव्हरच नाही तर गणपतीलाही सीट बेल्ट लावलेला असतो. हा व्हिडिओ 1.36 मिनिटांचा आहे. रस्ता सुरक्षेच्या महत्त्वावर विशेष भर दिल्याचे दिसून येते. व्हिडिओ शेअर करत आनंद महिंद्रा यांनी लिहिले आहे ‘गणेश चतुर्थीची एक कहाणी … भारताची एक कहाणी.
आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ड्रायव्हर गणपतीशी बोलत घरी जात आहे. ड्रायव्हर बाप्पाला सांगतो की तो एका वर्षानंतर घरी येत आहे. बाप्पाला घरी घेऊन चाललेला हा ड्रायव्हर अगदी साधेपणाने त्याला आपल्या घरातील सर्व गोष्टी सांगत आहे. खालील लींकवर क्लीक करून तुम्ही हा पूर्ण व्हिडीओ पाहू शकता.
गणेश चतुर्थी की एक कहानी…भारत की एक कहानी… pic.twitter.com/ExXMwsZq9z
— anand mahindra (@anandmahindra) August 31, 2022
या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी महिंद्रा अँड महिंद्रा समूहाच्या वतीने देशवासियांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच हा संदेशही व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आला की, जेव्हा देव वाहतूक नियम पाळू शकतो, तर मानव का नाही? वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यानी हा संदेश नक्कीच पाहायला पाहिजे.