मुंबई : अभिनेत्री केतकी चितळे ही शरद पावर यांच्याविरोधात केलेल्या एका पोस्टमुळे गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत राहिली आहे. दरम्यान त्या आक्षेपार्ह फेसबुक पोस्टमुळे केतकीला तुरुंगवासही भोगावा लागला होता. तसेच तिला तिच्या फेसबुक अकाउंटचा वापर करण्यालाही मनाई करण्यात आली होती. मात्र आता केतकी पुन्हा एकदा फेसबुकवर परत आली आहे.
केतकीला पुन्हा एकदा तिचे फेसबुक अकाउंट परत मिळाले आहे. फेसबुक अकाउंट परत मिळाल्या मिळाल्या तिने फेसबुकवरुन एक पोस्ट करत याविषयी आनंद व्यक्त केला आहे. केतकीने पोस्ट केली की, “अखेर मला माझ्या फेसबुकचा ॲक्सेस परत मिळाला आहे: निदान सध्यापुरता तरी…” तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
१३ मे २०२२ रोजी तिने शरद पवारांच्या विरोधात एक अक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यानंतर तिचे फेसबुक अकाउंट तिच्याकडून काढून घेण्यात आले होते. त्यानंतरची तिची ही नवीन पोस्ट २९ ऑगस्ट २०२२ ची आहे.
काही तासांपूर्वी शेयर केलेल्या या पोस्टला हजारो नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. त्यात अनेकांनी केतकीचे अभिनंदन केले आहे. तर काहींनी केतकीला काळजी घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे केतकीला तिच्या फेसबूकचे लॉग इन पुन्हा मिळाल्यानंतर तिच्या भूमिकेकडे नेटकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.