प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 18 – गेल्या अनेक दिवसांपासून करोना प्रतिबंधक लशींचा तुटवडा भासत होता. त्यामुळे या मोहिमेला काही अंशी खो बसला होता. मात्र आता मुबलक पुरवठा असल्याचे लसीकरण विभागाकडून सांगण्यात आले.
शहरासाठी कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन, कॉर्बेव्हॅक्स मिळून 84 हजार डोस शिल्लक आहे. तर, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण मिळून एकूण 3 लाख 9 हजार लशींचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे शहरात सर्व केंद्रांवर लसीकरण पुन्हा सुरू झाले आहे.
पुणे शहराला ऑगस्ट महिन्यात लस उपलब्ध न झाल्याने 68 पैकी केवळ सहाच केंद्रांवर कोविशिल्ड लस देण्यात येत होती. तर कोव्हॅक्सिन आणि कॉर्बेव्हॅक्स लस सर्व ठिकाणी उपलब्ध होती.
पुण्यासाठी राज्याकडून लशींचा पुरेसा साठा उपलब्ध झाला आहे. तसेच हर घर दस्तक मोहीम पुण्यात सुरू आहे. लस वितरणात पुणे ग्रामीणला सर्वाधिक लस प्राप्त झाली आहे. तर सर्वांत कमी लस पिंपरी-चिंचवडला मिळाली आहे.
-डॉ. संजोग कदम, आरोग्य उपसंचालक
पुणे शहरात आता सर्व लसीकरण केंद्रांवर म्हणजेच 68 ठिकाणी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनची लस मिळणार आहे. यामध्ये कोविशिल्डचे सर्व केंद्रांवर 200, कोव्हॅक्सिन आणि कॉर्बेव्हॅक्सचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
-डॉ. सूर्यकांत देवकर,
लसीकरण अधिकारी, पुणे महापालिका
इतकी लस आहे उपलब्ध
विभागकोविशिल्डकोव्हॅक्सिनकॉर्बेव्हॅक्सएकूण
पुणे शहर531106118062480176770
पिंपरी चिंचवड29860314102368084950
पुणे ग्रामीण1979096401838047810
एकूण102760102230104540309530