मुंढवा, दि. 12 (प्रतिनिधी) -केशवनगर येथे पुणे शहर भाजपाचे सरचिटणीस संदीप लोणकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी केशवनगर, मुंढवा, मांजरी परिसरातील 400 भगिनींनी सहभाग घेतला.
यावेळी संदिप लोणकर यांनी 400 महिलांकडून राखी बांधून घेतली, त्यांना भेट म्हणून साडी देण्यात आली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हडपसरचे संपर्कप्रमुख गिरीश तोलीवाल, शिल्पा लोणकर, ओमकांत बोने, संतोष माने, दिपक शिरोळे, नंदू लोणकर, आकाश भोसले, रणजित लोणकर, सतीश पाटील, सागर लोणकर, बालाजी साळुंखे, यश लोणकर, विक्रांत चौहान, प्रवीण मोहिते, ज्येष्ठ नागरिक, अखिल लोणकर मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.