औंध, दि. 12 (प्रतिनिधी) -मैत्री दिन आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव याचे औचित्य साधत रॉबिनहूड आर्मी (पुणे) या सामाजिक संस्थेने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध गुणदर्शनाच्या व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते.
बाणेर येथे ग्रॅव्हिटी सभागृहात सदर कार्यक्रम झाला. कैलास मनोहर, तेजस मेटे आणि तत्सम दिव्यांग मित्रांनी मिळून स्थापन केलेल्या मैत्री सेवासंघ संयोजित या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. मनोरंजक स्पर्धा तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार यावेळी करण्यात आला. योगीराज सोशल फाउंडेशनने सहकार्य केले.