सिंहगडरस्ता, दि. 12 (प्रतिनिधी) -स्वातंत्र्याच्या 75व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त तसेच रक्षाबंधन दिनानिमित्त खडकवासला येथील डीआयटी या सरकारी विभागातील हवाई दल, आर्मी, नेव्ही मधील विविध पदावर कार्यरत 75 जवानांना सिंहगड रोड परिसरातील विद्यार्थिनी, भगिनींनी राखी बांधत रक्षाबंधन साजरे केले.
या जवानांनी हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी प्रसन्न जगताप मित्र परिवाराला परवानगी दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. यावेळी या जवानांनी राखी बांधणाऱ्या भगिनींना भेटवस्तू देण्यात आल्या. या रक्षाबंधन सणानिमित्त येथील आपल्या घरापासून दूर असलेल्या जवानांना त्यांच्या सख्ख्या बहिणींच्या पोस्टाने येणाऱ्या राख्या पोहचायला उशीर होत असल्यामुळे त्यांना आजच्या दिवशी हा सण साजरा करता यावा यासाठी या रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी चंद्रकेतन, अंकित कुमार, अशोक पाल पी.सी.पती, बी.के.प्रधान, पी.के. विश्वासन, दुर्गेश कुमार आदी उपस्थित होते.