मुंबई – बॉलिवूड अभिनेता वरुण धवन सध्या त्याच्या आगामी ‘बावल’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण पोलंडमधील वॉर्सा येथे सुरू आहे. रिपोर्ट्सनुसार, बावल हा वरुणचा आतापर्यंतचा सर्वात जास्त बजेट असलेला चित्रपट असेल.
‘बावल’चा रोजचा खर्च अडीच कोटी रुपये
“प्लॅनिंगनुसार, अॅक्शन सीनसाठी अनेक गोष्टींची आवश्यकता असते. एका दिवसाच्या शूटिंगसाठी सुमारे 2.5 कोटी खर्च येतो आणि 10 दिवसांचे शेड्यूल आहे. वरुणचा हा आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट आहे.
चित्रपटाचा अॅक्शन डायरेक्टर जर्मनीचा
“आम्ही पॅरिस, बर्लिन, पोलंड, अॅमस्टरडॅम, क्राको, वॉर्सा यासारख्या महागड्या आणि मनोरंजक ठिकाणी तसेच भारतात चित्रपटाचा काही भाग शूट केला आहे. या चित्रपटातून अतिशय अनोखी प्रेमकथा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपतील शूटिंग अॅक्शन सीन वॉरसॉमध्ये शूट करण्यात आला आहे. चित्रपटाचे अॅक्शन डायरेक्टर आणि स्टंटमॅन हे जर्मनीतील आहेत. चित्रपटाच्या क्रूमध्ये सुमारे 700 लोक आहेत.
‘बावल’ हा चित्रपट ७ एप्रिलला प्रदर्शित होणार
नितेश तिवारी ‘बावल’ चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर साजिद नाडियादवाला त्याची निर्मिती करत आहेत. या चित्रपटात वरुणसोबत जान्हवी कपूरही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. पुढील वर्षी ७ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.